पब्लिक डाटा एन्ट्री (PDE )

 • पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) म्हणजे काय ?
   

  संगणकीकृत दस्त नोंदणी पद्धतीमध्ये दस्तविषयक माहिती जसे की, मिळकत, दस्तातील पक्षकार, मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, ओळखदार इत्यादी विषयांची माहिती संगणकात भरावी लागते. ही माहिती पक्षकाराला स्वतःला कोणत्याही वेळी कोणत्याही िकाणाहून भरता यावी, यासा ी विभागाच्या संकेतस्थळावर जी सुविधा उपलब्ध आहे, त्याला पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) म्हणून संबोधले जाते.
 • पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) चे जनतेला काय फायदे आहेत ?
   

  • पब्लिक डाटा एन्ट्री द्वारे पक्षकार स्वतःच्या दस्ताची माहिती केव्हाही व को ूनही भरु शकतात.
  • ही माहिती पक्षकार स्वतः भरत असल्याने अधिक अचूक असते.
  • दस्त नोंदणीसा ी पक्षकारांचा दुय्यम निबंधक कार्यालयातील वेळ वाचतो.

 • पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) ही सुविधा को े उपलब्ध आहे ?
   

  पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) ची सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर, Online Services या सदराखाली PDE FOR Registration या िकाणी उपलब्ध आहे.
 • पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) सा ी कोणती पूर्वतयारी करावी ?
   

  पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) चा वापर करण्यापूर्वी खालीलप्रमाणे सर्व माहिती पक्षकाराकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे.

  • ज्या दस्ताची नोंदणी करावयाची आहे त्या दस्तातील मालमत्तेची/व्यवहाराची सर्व माहिती
  • त्या दस्तातील सर्व पक्षकारांची माहिती
  • दस्ताचे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरल्याची माहिती
  • ओळखदारांची माहिती

  उपरोक्त प्रमाणे पूर्वतयारी केल्यास पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) करणे सोपे होते.

 • पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) या सुविधेचा वापर कसा करावा ?
   

  • पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) या सुविधेचा वापर करुन नोंदवावयाच्या दस्तांची माहिती भरण्यासा ी (PDE) नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in संकेतस्थळावरील Online Services या सदराखालील PDE FOR Registration हा पर्याय निवडावा.
  • PDE वर क्लिक केल्यानंतर या सुविधेचा वापर सुरु करण्यापूर्वी सदर सुविधेची माहिती देणारे manual काळजीपूर्वक वाचावे.
  • PDE या सुविधेकरिता Log In करण्यासा ीचा पासवर्ड लक्षात ेवावा.
  • Log In केल्यानंतर PDE सा ी केलेल्या पूर्वतयारी नुसार नोंदणी करावयाचा दस्त, मिळकत, पक्षकार आदीबाबतची माहिती अचूकरित्या भरावी.
  • डाटा एन्ट्रीतील चुका दुरुस्त करण्यासा ी Edit चा पर्याय उपलब्ध असून त्यावेळी पब्लिक डाटा एन्ट्रीच्या वेळी वापरलेला Log In Id व Password वापरावा लागतो.
  • डाटा एन्ट्री मरा ी व इंग्रजी मधे केली जात असून मरा ी व इंग्रजीमधील मजकुरात तफावत आली, तर मरा ीतील मजकूर ग्राहय धरला जातो.

 • पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) पूर्ण केल्यानंतर पुढील कार्यवाही कशी असते ?
   

  PDE या सुविधेतुन दस्ताची डाटा एन्ट्री पूर्ण झाल्यानंतर

  • निर्माण झालेला 11 अंकी सांकेतांक (उदा. 27051452229) आपल्याकडे काळजीपूर्वक नोंदवून ेवावा.
  • केलेल्या डाटा एन्ट्री मध्ये उणीवा आढळल्यास Edit सुविधेचा वर नमूद केल्या प्रमाणे वापर करुन दुरुस्त्या कराव्यात.
  • दस्त नोंदणीकरिता आपण आपल्या स्तरावर तारीख, वेळ व दुय्यम निबंधक कार्यालय निश्चित केले असल्यास, नोंदणी सा ीची वेळ विभागाच्या e-Step-in या सुविधेचा वापर करुन आरक्षित करावी.
  • पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) चा वापर करुन तयार झालेल्या माहितीची 1 प्रिंट साक्षांकित करुन ेवावी
 • दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसा ी जाताना सोबत काय घेवून जावे लागते ?
   

  दस्त नोंदणीसा ी दुय्यम निबंधक कार्यालयात जाताना पुढील कागदपत्रे सोबत घेऊन जाणे आवश्यक असते.

  • I. योग्य मुद्रांक शुल्क भरलेला व सर्व पक्षकारांनी सहया केलेला मूळ दस्त
  • II. ई-पेमेंट द्वारे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरलेली असल्यास त्याबाबतचा पुरावा.
  • III. दस्ताच्या कबुलीजबाबासा ी हजर राहणा-या सर्व पक्षकारांची छायाचित्र असलेली ओळखपत्रे, त्यांचे ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक
  • IV. ओळख पटविणा-या व्यक्ती व त्यांची छायाचित्र असलेली ओळखपत्रे.
  • V. दस्त प्रकारानुसार आवश्यक कागदपत्रे (कागदपत्रांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Actvities या सदराखाली Document Registration या िकाणी उपलब्ध आहे.
  • VI. नोंदणी करावयाच्या दस्ताच्या प्रति पान रुपये 20/- या दराने रोखीने भरावयाची दस्त हाताळणी शुल्काची रक्कम.
  • VII. कुलमुखत्यारपत्राचे (Power of Attorney) आधारे कुलमुखत्यारधारकाने दस्त निष्पादित केला असेल, तर किंवा कुलमुखत्यारपत्राचे आधारे मूळ मालकाचे वतीने दस्त नोंदणीस सादर करण्यात येत असेल किंवा कबुलीजबाब देण्यात येत असेल, तर अशा अधिकाराचे मुखत्यारपत्र, त्याची सत्य प्रत व कुलमुखत्यारपत्र अस्तित्वात (अंमलात) असल्याबाबत विहित नमुन्यातील घोषणापत्र.
  • VIII. जर पब्लिक डाटा एन्ट्री पर्यायाचा वापर करण्यात आला असेल तर, त्याद्वारे प्राप्त 11 अंकी सांकेतांक व नोंदणीपूर्व गोषवा-याची प्रिंट. जर पब्लिक डाटा एन्ट्री केली नसेल, तर दस्ताची माहिती नमूद केलेला इनपुट फॉर्म व दुय्यम निबंधक कार्यालयात रोखीने भरावयाच्या डाटा एन्ट्री शुल्काची रक्कम रुपये 20/-
  • IX. जर इ-स्टेप-इन द्वारे वेळ आरक्षित केली असेल तर, त्याची पावती.
  • X. दस्त खरेदी विक्रीचा असल्यास आणि दस्तातील मोबदला/किंमत/व्यवहार रु. 5
  • लाखांपेक्षा व त्यापेक्षा अधिक असल्यास दस्तातील पक्षकारांचे पॅनकार्ड अनिवार्य व नसल्यास फॉर्म 60 किंवा 61 आवश्यकतेनुसार भरणे.
  • XI. PDE ची स्वसाक्षांकित (Self Attested) प्रत सोबत घ्यावी व दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्याबरोबर ही प्रत दुय्यम निबंधक यांना द्यावी.

 • पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) सा ी किती फी आहे ?
   

  • आपण स्वतःच संगणकाचा वापर करुन पब्लिक डाटा एन्ट्री द्वारे डाटा एन्ट्री करुन आणल्यास कोणतीही फी आकारली जात नाही. पक्षकारांनी अचूक डाटा एन्ट्री करुन आणणे अपेक्षित आहे.
  • पब्लिक डाटा एन्ट्रीचा वापर न करता आपल्या दस्ताची सर्व डाटा एन्ट्री दुय्यम निबंधक कार्यालयात केल्यास त्यासा ी रु. 20/- इतकी डाटा एन्ट्री फी आकारली जाते.
 • PDE सुविधेचा वापर करुन डाटा एन्ट्री करतांना झालेल्या चुका दुरुस्त करण्याची कार्यपध्दती कशी आहे ?
   

  PDE सुविधेचा वापर करुन डाटा एन्ट्री करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासा ी

  • • या सुविधेच्या Home Page वरील Edit या पर्यायाचा वापर करा.
  • • डाटा एन्ट्री करताना वापरलेला Log In Id, Password आणि मिळालेला 11 अंकी सांकेतांक वापरुन आपण भरलेली माहिती पुन्हा खुली करुन घ्यावी आणि झालेल्या चुका दुरुस्त कराव्यात.

 • सामायिक कार्यक्षेत्रातील (Concurrent Jurisdiction) दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्यासा ी PDE चा वापर करुन डाटा एन्ट्री करताना कोणते कार्यालय निवडावे ?
   

  सामयिक कार्यक्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणी करण्यासा ी PDE चा वापर करताना अशा सामायिक कार्यक्षेत्रातील कोणत्याही कार्यालयाची निवड केली, तरी या PDE चा वापर करुन या सामायिक क्षेत्रातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदविता येतो.
 • पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) मधे माहिती भरतांना कोणत्या भाषांचा वापर करता येतो ?
   

  PDE मध्ये मरा ी आणि इंग्रजी भाषांचा वापर करुन माहिती भरता येते. तथापि, इंग्रजी व मरा ीतील माहितीमधे तफावत आढळल्यास मरा ीतील माहिती ग्राहय धरली जाते.
 • पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) द्वारे केलेली डाटा एन्ट्री अशी डाटा एन्ट्री केल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करीता किती काळ वापरता येते ?
   

  पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) द्वारे केलेली डाटा एन्ट्री अशी डाटा एन्ट्री केल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणी करीता 30 दिवसांपर्यंत वापरता येते.
 • पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) द्वारे दस्ताची डाटा एन्ट्री केल्यानंतर प्राप्त झालेला 11 अंकी सांकेतांक दस्त नोंदणी करण्यापूर्वी विसरल्यास काय करावे ?
   

  पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) द्वारे दस्ताचा डाटा एन्ट्री केल्यानंतर प्राप्त झालेला 11 अंकी सांकेतांक दस्त नोंदणी करण्यापूर्वी विसरल्यास नव्याने डाटा एन्ट्री करणे गरजेचे आहे.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]