ई-स्टेप इन (e-Step in)

 • ई-स्टेप- इन म्हणजे काय ?
   

  • दस्त नोंदणीसा ी दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ ऑनलाईन आरक्षित ( Advance booking ) करुन घेण्यासा ी विभागाने उपलब्ध करुन दिलेली सुविधा म्हणजे ' ई-स्टेप-इन ' होय.
  • सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात या सुविधेद्वारे दस्त नोंदणी सा ी वेळ आरक्षित करता येते.

  या सुविधेचा वापर करुन खालील कालावधीतील सोयीची वेळ आरक्षित करता येते.

  1. सकाळी 10 ते सांयकाळी 6 ही कामाची वेळ असलेल्या कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत
  2. सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत कामाचा वेळ असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत
  3. दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत कामाची वेळ असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात दुपारी 2 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत

  * दस्त नोंदणी करीता पक्षकाराने दुय्यम निबंधक कार्यालयात, आरक्षित केलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी येणे आवश्यक

 • ई-स्टेप-इन ‘ या सुविधेचे फायदे काय आहेत ?
   

  ई-स्टेप-इन ‘ या सुविधेचा वापर करुन

  • आपण दस्त नोंदणीसा ीची वेळ आरक्षित करु शकता
  • ज्या दुय्यम निबंधक कार्यालयामधे आपणांस दस्त नोंदवावयाचा आहे, त्या कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेपैकी 'ई-स्टेप- इन' सुविधेसा ी वेगळया ेवलेल्या वेळेपैकी आपल्या सोईची वेळ आरक्षित करता येत असल्याने रांगेमध्ये थांबण्याची आवश्यकता नाही.
  • वेळेवर नोंदणीसा ी पोहचल्यावर सेवा मिळत असल्याने वेळेची बचत होते.
  • सामायिक कार्यक्षेत्रातील कोणत्याही कार्यालयातील आरक्षित झालेल्या वेळा माहिती होतात व त्यानुसार आपल्या सोयीची वेळ निवडता येते.

 • नागरिकांना ‘ ई-स्टेप-इन ‘ ही सुविधा को े उपलब्ध आहे ?
   

  नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली e-Step- in या िकाणी उपलब्ध आहे.
 • ‘ई-स्टेप-इन ‘ सुविधा वापरण्यासा ी कोणती पूर्वतयारी केलेली असावी ?
   

  ‘ई-स्टेप-इन ‘ सुविधा वापरण्यासा ी

  • पब्लिक डाटा एन्ट्रीची सुविधा वापरुन डाटा एन्ट्री केलेली असावी व पब्लिक डाटा एन्ट्रीचा 11 अंकी सांकेतांक माहिती असावा.
  • दस्तासा ी आवश्यक मुद्रांक शुल्क भरलेले असावे व त्याचा तपशील माहिती असावा.
 • ‘ई-स्टेप-इन ‘ सुविधेचा वापर कसा करावा याची कार्यपद्धती सांगा ?
   

  ‘ई-स्टेप-इन ‘ या सुविधेचा वापर करण्यासा ी स्वतंत्र लॉग इन आवश्यक नाही
  i. नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online Services या सदराखालील e-Step- in या पर्यायावर क्लिक करा आणि Token Booking हा पर्याय निवडावा.

  ii. त्यानंतर बुकींग पर्यायावर क्लिक करावे.

  iii. आपल्याला ज्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवावयाचा आहे त्याचा जिल्हा निवडावा.

  iv. त्या दुय्यम निबंधक कार्यालयाची पाहिजे असलेली वेळ निवडावी.


  v. आपणास हवी असलेली तारीख निवडावी.

  vi. आपल्या आवश्यकतेप्रमाणे दुय्यम निबंधक कार्यालय निवडावे.

  vii. आपल्याला सामायिक कार्यक्षेत्रातील कार्यालय निवडावयाचे असल्यास आणि त्यात पाच पेक्षा अधिक दुय्यम निबंधक कार्यालये असल्यास त्यातील किमान पाच कार्यालयांची निवड करावी.


  viii. Countinue बटणावर क्लिक करावे, वेळ उपलब्ध असल्यास आरक्षण करता येईल.

  ix. पब्लिक डाटा एन्ट्रीचा 11 अंकी सांकेतांक नमूद करावा.

  x. Verify बटणावर क्लिक करावे.

  xi. उपलब्ध वेळांपैकी आपल्या सोईची वेळ निवडावी.

  xii. Book बटणावर क्लिक करावे.

  xiii. यशस्वी डाटा एन्ट्रीनंतर आपणाला आरक्षणाचा संदेश दिसेल, ज्यामधे दुय्यम निबंधक कार्यालयाचे नाव, आरक्षित वेळेचा सांकेतांक (token number) नमूद असेल तो काळजीपूर्वक नोंदवून ेवावा. त्याच संदेशामधे आवश्यकता भासल्यास करावयाच्या पुनःआरक्षणाचा सांकेतांक (Rebooking Id) नमूद असेल, तो देखील नोंदवून ेवावा.

  xiv. वेळेच्या आरक्षणाची पावती प्रिंट करण्यासा ी रिसिट बटणावर क्लिक करावे.

  xv. आपणास रिसीट दिसेल, त्यानंतर Control + P बटण दाबावे.

 • या सुविधेचा वापर करुन दस्त नोंदणीसा ी वेळ आरक्षित करण्यासा ी काही जादाची फी दयावी लागते का ?
   

  नाही. ही सुविधा मोफत आहे.
 • दस्त नोंदणीसा ी e-Step- in चा वापर करुन एकदा आरक्षित केलेली वेळ कशी बदलता येते ?
   

  e-Step- in या सुविधेचा वापर करुन दस्त नोंदणीची आरक्षित वेळ काही कारणास्तव गैरसोईची रत असल्यास आरक्षित वेळेपूर्वी त्यात बदल करुन नवीन वेळ पुन: आरक्षित (Re-booking) करता येते.

  पुनः आरक्षण (Rebooking) या पर्यायाचा वापर एकदाच करता येतो. त्यासा ी आपल्याला 'ई-स्टेप इन' सुविधेतील Rebooking पर्यायाचा वापर करावा लागतो.

  • वेळ पुन: आरक्षित करण्यासा ी आपणास आपला टोकन क्रमांक आणि Rebooking चा सांकेतांक माहिती असणे आवश्यक आहे.
  • आरक्षित वेळ/तारीख Rebooking च्या माध्यमातून बदलून घेण्यासा ी Rebooking बटणावर क्लिक करावे.
  • आपला बुकींग टोकन क्रमांक व Rebooking सांकेतांक भरावा.
  • कॅलेंडर मधून आपली Rebooking ची तारीख निवडावी.
  • उपलब्ध वेळांमधून सोयीची वेळ निवडावी.
  • Rebook बटणावर क्लिक करावे.
 • ‘ई-स्टेप-इन ‘ द्वारे वेळ आरक्षित केल्याचा कोणता पुरावा मिळतो ?
   

  ‘ई-स्टेप-इन ‘ या सुविधेद्वारे वेळ आरक्षित केल्याचा पुरावा म्हणून आरक्षणाच्या प्रक्रीयेच्या अखेरीस पावती निर्माण होते.
 • ‘ई-स्टेप-इन ‘ या सुविधेद्वारे किती दिवस अगोदर वेळ आरक्षित करता येते ?
   

  दस्त नोंदणीच्या जास्तीत जास्त 30 दिवस व कमीत कमी 1 दिवस अगोदर 'ई-स्टेप-इन' या सुविधेद्वारे दस्त नोंदणीसा ी वेळेचे आरक्षण करता येते.
 • एक व्यक्ती एका दिवशी किती वेळा (time slots) आरक्षण करु शकते ?
   

  एक व्यक्ती एका दिवशी जास्तीत जास्त 2 वेळा (2 time slots) आरक्षित करु शकते
 • ‘ई-स्टेप- इन' ची सुविधा सर्व प्रकारच्या दस्तांसा ी उपलब्ध आहे का?
   

  नाही. मृत्युपत्र आणि अभिनिर्णीत (Adjudicated) दस्त वगळता उर्वरित सर्व प्रकारच्या दस्तांच्या नोंदणीसा ी ही सुविधा वापरता येते.
 • ‘ई-स्टेप- इन' द्वारे वेळ आरक्षित केलेल्या दिवशी सुटी जाहीर झाल्यास काय करावे ?
   

  आपण ज्या दिनांकासा ी 'ई-स्टेप-इन' द्वारे वेळ आरक्षित केली आहे, त्या दिनांकाला ऐनवेळी सुटी जाहीर झाल्यास त्यानंतर कामकाजाच्या दिवशी संबंधित दुय्यम निबंधक वेळेच्या उपलब्धतेनुसार (Avaliability of time slot) आपला दस्त प्राधान्याने नोंदणीस स्विकारतील.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]