ई-सर्च (e-Search)

 • ई-सर्च (e-Search) म्हणजे काय ?
   

  एखादया मालमत्तेबाबत नोंदणी विभागाकडे पूर्वी नोंदविलेला दस्त नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन शोधण्यासा ीची सुविधा म्हणजे ई-सर्च होय. मिळकतीच्या क्रमांकावरुन किंवा दस्ताच्या क्रमांकावरून पूर्वीचे व्यवहार शोधण्याची सुविधा विभागाच्या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली उपलब्ध आहे.
 • ई-सर्च (e-search) या सुविधेचे फायदे कोणते आहेत ?
   

  कोणत्याही मिळकतीचा व्यवहार करण्यापूर्वी त्या मिळकतीच्या मालकी हक्कात झालेले बदल तपासणे खरेदीदाराच्या हिताचे असते. पूर्वी असे बदल तपासण्यासा ी संबंधित कार्यालयास भेट देऊन शोध घेणे गरजेचे होते. सामायिक कार्यक्षेत्रात (Concurrent Jurisdiction) एका पेक्षा अधिक कार्यालये असतात त्यामुळे नागरिकांना अशा कार्यक्षेत्रातील व्यवहारांचा शोध घेण्यासा ी त्रास होत असे. या सर्व बाबींचा विचार ई-सर्च च्या माध्यमातून करुन नागरिकांच्या सोयीसा ी सन 2002 नंतर संगणकीकृत पद्धतीने नोंदविलेल्या सर्व दस्तांचा शोध ई-सर्च द्वारे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ई-सर्च (e-search) द्वारे घर बसल्या 24 तास असा शोध घेता येतो.
 • ई-सर्च (e-search) सुविधा को े उपलब्ध आहे ?
   

  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली या िकाणी ही सुविधा उपलब्ध आहे.
 • ई-सर्चच्या माध्यमातून शोध घेण्यासा ी किती सर्च फी आकारली जाते ?
   

  ई-सर्चच्या माध्यमातून शोध घेण्यासा ी प्रति मिळकत, प्रति वर्ष रु. 25/- इतके आकारले जातात. मात्र किमान रु.300/- इतकी शोध फी भरावी लागते.
 • ई- सर्च प्रणालीचा वापर करण्यासा ी फी कशी भरावी ?
   

  • नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Online Services या सदराखालील 'ई सर्च' हा पर्याय निवडावा.
  • आपण नोंदणीकृत वापरकर्ते (Registered User) नसल्यास स्वत:ची नोंदणी करावी.
  • आपला User Id व Password वापरून Log- In करावे.
  • त्यानंतर आपणांस उपलब्ध होणा-या वेब पेजच्या डाव्या बाजूला Make a New Payment हा पर्याय दिसेल तो पर्याय निवडावा.
  • त्यानंतर आपणास भरावयाची रक्कम नमूद करुन Confirm and Submit चा पर्याय निवडावा.
  • त्यानंतरच्या पृष् ावर भरावयाची रक्कम तपासून Submit चा पर्याय निवडावा, या नंतर आपण GRAS या वेबसाईटवर जाल, त्या पृष् ावरील आपण प्रदान कशा प्रकारे करणार याचा पर्याय निवडावा (e-payment or Across the counter payment), बँक निश्चित करावी आणि Proceed for Payment पर्याय निवडावा.
  • आपला GRN क्रमांक काळजीपूर्वक नोंदवून ेवावा व आपण निश्चित केल्या प्रमाणे प्रदान करावे.

 • ‘ई-सर्च' प्रणालीद्वारे नोंदविलेल्या दस्ताचा शोध कोणकोणत्या बाबींच्या आधारे घेता येतो ?
   

  • 'ई-सर्च' च्या माध्यमातून नोंदविलेल्या दस्ताचा शोध दस्त क्रमांकावरुन आणि मिळकत क्रमांकावरुन घेता येतो.
  • दस्त क्रमांकावरुन (Document number) शोध घेण्यासा ी दस्ताचा क्रमांक, दस्त नोंदणीचे वर्ष आणि दस्त नोंदविलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे नाव माहीत असावे.
  • मिळकत क्रमांकावरुन (Property number) शोध घेण्यासा ी गावाचे नाव आणि मिळकत क्रमांक (सर्वे नंबर/ प्लॉट नंबर/ गट नंबर/ प्रॉपर्टी नंबर) माहिती असावे.

 • ‘ई-सर्च' प्रणालीद्वारे व्यक्तीच्या नावाने शोध घेता येतो का ?
   

  ‘ई-सर्च' प्रणालीद्वारे व्यक्तीच्या नावाने/नावावर शोध घेता येत नाही.
 • ‘ई-सर्च' वापर करुन शोध घेण्याची सर्वसाधारण कार्यपध्दती सांगा ?
   

  नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Online Services या सदराखालील e-Search हा पर्याय निवडावा.
  आपणांस दस्त क्रमांकावरुन शोध घ्यावयाचा, की मिळकत क्रमांकावरुन शोध घ्यावयाचा आहे हे प्रथम निश्चित करावे.
  1) मिळकतनिहाय दस्त शोधण्याचा पर्याय निवडल्यास
  i. मिळकतीचा जिल्हा निवडा.
  ii. गावाच्या नावातील पहिली तीन इंग्रजी अक्षरे 'गावाचे नाव भरा' या रकान्यामध्ये नमूद करावी. मिळकतीच्या गावाच्या नावाची अशी इंग्रजी अक्षरे निवडताना गावाचे नावाचे स्पेलिंग योग्य पद्धतीने लिहिले जाईल याची काळजी घ्यावी,
  iii. त्यानंतर Submit चा पर्याय निवडावा.
  iv. त्यानंतर 'गाव निवडा' पर्यायातून गाव निवडावे.
  v. त्यानंतर मिळकत क्रमांक भरावा.
  vi. 'शोध' बटनावर क्लिक करा. त्याच पृष् ावर आपणांस सदर मिळकती बाबत नोंदविण्यात आलेल्या व्यवहारांची यादी दिसेल, त्यातून आपणास आवश्यक असलेला व्यवहार शोधा.
  vii. आवश्यकता असल्यास शोध घेतलेल्या व्यवहाराची सूची 2 व दस्त आपण डाऊनलोड करु शकता. शोधलेल्या दस्ताचा डॉक्युमेंट आयडी नोंदवून ेवा. तो ID दस्त डाऊनलोड करण्यासा ी आवश्यक आहे.

  2) दस्त क्रमांकावरुन शोध घ्यावयाचा असल्यास
  i. दुय्यम निबंधक कार्यालयाचा जिल्हा निवडावा.
  ii. दुय्यम निबंधक कार्यालय निवडावे.
  iii. दस्त नोंदणीचे वर्ष निवडावे.
  iv. दस्त क्रमांक भरावा.
  v. त्यानंतर शोध पर्यायावर क्लिक करावे.
  vi. त्यानंतर आपणांस आवश्यक दस्ताची माहिती त्याच पृष् ावर उपलब्ध होईल.

 • ई-सर्च या सुविधेमध्ये कोणत्या कार्यालयातील, कोणत्या कालावधीच्या दस्ताच्या सूची क्र. 2 उपलब्ध आहेत ?
   

  • ई-सर्च या सुविधेमधे सन 2002 पासून आपण शोध घेत असलेल्या वेळेपर्यंत संगणकीकृत पद्धतीने नोंदविण्यात आलेल्या बहुतांश दस्तांच्या सूची 2 उपलब्ध आहेत.
  • सन 2002 पूर्वीच्या दस्तांची अशी माहिती ई-सर्चच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • ई-सर्च द्वारे उपलब्ध सूची 2 व दस्तांची कार्यालयनिहाय यादी या सुविधेच्या होमपेजवर उपलब्ध आहे.

 • या सुविधेमध्ये मृत्युपत्र, कुलमुखत्यारपत्र यांच्या सूची उपलब्ध आहेत का ?
   

 • ई-सर्च या सुविधेकरिता सर्च फी भरल्यानंतर पावती मिळते का ?
   

  होय, अशी सर्च फी भरल्यानंतर आपणास त्याची पावती मिळते.
 • ई-सर्च या सुविधेकरिता सर्च प्रणालीद्वारे सर्च फी भरल्यानंतर संगणकाव्यतिरिक्त दुय्यम निबंधक कार्यालयात देखील प्रत्यक्ष शोध घेता येतो का ?
   

  होय. ई-सर्च सुविधेमधे फी भरल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालयात वेगळी फी न भरता शोध घेता येतो.
 • ज्या कालावधीची माहिती ई-सर्च या प्रणालीमध्ये उपलब्ध नाही, त्या माहीतीचा शोध को े घेता येईल ?
   

  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in संकेतस्थळावरील Online Services या सदराखालील e-Search या सुविधेचा पहील्या पानावर (Home Page) अनुपलब्ध कालावधी /कार्यालयांची यादी दिली आहे. अशा प्रकरणी शोध घेण्यासा ी आपणांस संबंधीत दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागेल.
 • नोंदणी झालेल्या दस्तांचा वारंवार शोध घ्यावा लागत असेल (Frequent user ) तर काय प्रक्रीया अवलंबवावी ?
   

  • e Search या सुविधेचा वापर करुन आपण राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविलेल्या व या प्रणालीमधे उपलब्ध असलेल्या दस्तांचा / सुची 2 चा शोध घेऊ शकता.
  • अशा प्रकारे वारंवार शोध घेण्यासा ी आपण एकदा केलेले आपले User Registration वापरु शकता.
  • GRAS प्रणालीचा वापर करुन शोधासा ीची सर्च फी भरण्यासा ी एकदम रक्कम प्रदान करु शकता व प्रत्येक वेळी शोध घेतल्यानंतर त्या रक्कतेतून शोध फी कमी होते.

 • सूची (Index) व डॉक्युमेंट डाऊनलोड म्हणजे काय ?
   

  ‘ई-सर्च‘ या सुविधेचा वापर करुन शोधलेल्या दस्ताची अथवा दस्ताच्या सूचीची (Index) प्रत (Soft Copy) आपण आपल्या संगणकामधे सा वू शकता, याला डाऊनलोड म्हणतात.
 • सूची (Index) व डॉक्युमेंट डाऊनलोड ही सुविधा को े उपलब्ध आहे ? कोणत्या कार्यालयांच्या कोणत्या कालावधीच्या दस्तांच्या प्रती या सुविधेद्वारे मिळू शकतात ?
   

  नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Online Services या सदराखालील ‘ई-सर्च‘ सुविधेच्या पहिल्या पानावर ही सुविधा उपलब्ध आहे. ‘ई-सर्च‘ च्या मुख्य पानावर (Home Page) सर्वांत वर Document availability office list मध्ये या सुविधेतील उपलब्ध दस्तांची माहिती देण्यात आली आहे.
 • डॉक्युमेंट डाऊनलोडची कार्यपद्धती सांगा
   

  डॉक्युमेंट डाऊनलोड करण्यासा ी प्रथमतः प्रश्न 8 च्या उत्तराच्या मध्ये सविस्तररित्या नमूद केल्याप्रमाणे Document ID प्राप्त करुन घ्यावा त्यानंतर किमान 30 मिनिटांनी

  • ई- सर्च सुविधेच्या मुख्य पानावरील डॉक्युमेंट डाऊनलोड पर्याय निवडावा.
  • त्यामध्ये आपण शोधलेल्या दस्ताचा डॉक्युमेंट आयडी नमूद करावा.
  • त्यानंतर डाऊनलोड बटणावर क्लिक करावे.
  • आपण ज्या चलनाने सर्च फी भरली आहे त्या चलनाचा GRN (Government Receipt Number) नमूद करावा.
  • पुन्हा डाऊनलोड बटणावर क्लिक करावे.
  • आपण निवडलेल्या दस्ताची प्रत उपलब्ध झालेली असेल. ती आपल्या संगणकावर सा वून (Save करुन) ेवावी.

 • डॉक्युमेंट डाऊनलोडसा ी किती फी भरावी लागते ?
   

  एका दस्ताची प्रत डाऊनलोड करण्याकरिता रु. 100/- इतकी फी आकारली जाते.
 • डाऊनलोड केलेली दस्ताची प्रत पुन्हा पाहण्यासा ी कोणते सॉफ्टवेअर आवश्यक आहे?
   

  डाऊनलोड केलेली दस्ताची प्रत पुन्हा योग्य रितीने पाहण्यासा ी कोणतेही (Online Document Viewer) सॉफ्टवेअर (उदा http://www.docspal.com/viewer ) आवश्यक असते.
 • डॉक्युमेंट डाऊनलोड फी कशी भरावी?
   

  ई-सर्च सुविधेमध्ये लॉग इन केल्यानंतर
  i. नवीन प्रदानाचा (New Payment) पर्याय निवडावा.
  ii. आपणांस प्रदान करावयाची रक्कम नमूद करावी.
  iii. त्यानंतर Confirm पर्याय निवडावा.
  iv. त्यानंतर Submit वर क्लिक करावे.
  v. GRAS या संकेतस्थळावर आपण पोहचला असाल
  vi. आपली बँक निवडावी आणि प्रदान करावे (Proceed for Payments)
  vii. GRN तयार होईल, त्याची अपणाकडे काळजीपूर्वक नोंद करुन घेऊन OK बटणावर क्लिक करावे.
  viii. आपल्या नेटबँकिंग सुविधेसा ीचा बँकेचा लॉगइन आयडी व पासवर्ड भरावा.
  ix. ऑनलाईन पेमेंट प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा ई-सर्च लॉग इन पृष् ावर पोहचाल, तेथे लॉग इन करावे.
  x. त्यानंतर Get GRN या लिंकवर क्लिक करावे, GRN व बँक CIN (Challan Indentification Number) क्रमांक मिळेल.
  xi. चलनावर CIN दिसत नसेल, तर Verify transaction वर क्लिक करावे.
  xii. बँकेद्वारे आपण प्रदान केलेली रक्कम शासनाकडे जमा करण्याची प्रक्रीया सुरु असेल, तर ती पूर्ण झाल्यानंतर बँक CIN दिसेल

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]