ई-फायलिंग (e-Filing)

 • ई-फायलिंग म्हणजे काय ?
   

  डिपॉझिट ऑफ टायटल डीड पद्धतीने होणा-या कर्ज व्यवहारांच्या अनुषंगाने त्या कर्जदाराने कर्ज व्यवहाराची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयात नोटिस स्वरुपात सादर करणे आवश्यक असते. या संदर्भात सविस्तर माहितीसा�� ी पहा, याच पुस्तकातील भाग- 2 मधील प्रकरण 'नोटिस ऑफ इंटिमेशन फायलिंग करणे'. सामान्यतः सदर नोटिस फाईल करण्यासा�� ी कर्जदारांना दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष जावे लागते. या कामी नागरिकांचा वेळ व श्रम याची बचत व्हावी, याकरिता नोंदणी व मुद्रांक विभागाने 'ई- फायलिंग' ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सदर सुविधा केवळ बँकांना व वित्तीय संस्थाना उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करून बँक व वित्तीय संस्था आपल्या कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाच्या अनुषंगाने दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करावयाच्या नोटिसा आपल्या शाखेमधूनच तयार करुन ऑनलाईन पद्धतीने दुय्यम निबंधक कार्यालयांना पा�� वू शकतात. नोटिस देण्यासा�� ी कर्जदारांना दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष येण्याची गरज नसते.
 • ई-फायलिंग ही सुविधा को�� े उपलब्ध आहे ?
   

  ई-फायलिंग ही सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘Online Services‘ या सदराखाली e-filing या �� िकाणी उपलब्ध आहे.
 • ई-फायलिंग या सुविधेचा वापर कर्जदारांना थेट करता येतो का ?
   

  नाही. सदर सुविधा केवळ इच्छुक बँका/वित्तीय संस्था यांच्या मार्फत वापरता येते. सध्या या सुविधेचा वापर करणा-या अशा बँका/संस्थांची यादी www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Agencies या सदराखाली Banks या �� िकाणी उपलब्ध आहे.
 • ई-फायलिंग सुविधेचे नागरिकांना कोणते फायदे होतात ?
   

  ई-फायलिंग सुविधेचे नागरिकांना होणारे प्रमुख फायदे-

  • नागरिकांना नोटिस सादर करण्यासा�� ी दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत नाही. संबंधित बँक/वित्तीय संस्था यांच्या शाखेतूनच नागरिकांना नोटिस फायलिंगची सर्व कार्यवाही पूर्ण करता येते.
  • दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष जावून नोटिस फाईल केली असता, रु. 300/-इतके दस्त हाताळणी शुल्क आकारले जाते. सदर रु. 300/- दस्त हाताळणी शुल्क ई- फायलिंगमध्ये भरावे लागत नाही. त्यामुळे नागरिकांची रु. 300/- ची बचत होते.
  • कार्यालयात येण्याजाण्याच्या वेळेमध्ये बचत होते व रांगेत थांबण्याची आवश्यकता राहत नाही.
  • नोटिस फायलिंगची कार्यवाही तत्परतेने होते व पक्षकारांची कर्जप्रकरणे तत्परतेने मार्गी लागतात.�
 • ई-फायलिंग ही सुविधा कोणत्याही बँक/वित्तीय संस्थेला उपलब्ध होऊ शकते का ?
   

  होय. नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करणा-या कोणत्याही बँकेस/ वित्तीय संस्थेस सदर सुविधा उपलब्ध होऊ शकते. या अर्जाचा विहीत नमुना व सविस्तर कार्यपद्धती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली e-Filing या �� िकाणी उपलब्ध आहे..
 • ई-फायलिंग या सुविधेद्वारे सदर नोटिस ऑफ इंटिमेशन ऑनलाईन फाईल करण्याच्या कार्यपद्धतीला कोणत्या नियमांचा आधार आहे ?
   

  नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 69 अंतर्गत विहीत ' ई-फायलिंग व ई- रजिस्ट्रेशन नियम 2013' अन्वये ई-फायलिंग कार्यपद्धती विहीत करण्यात आली आहे.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]