पब्लिक डाटा एन्ट्री फॉर नोटिस फायलिंग (PDE For Notice Filing)

 • पब्लिक डाटा एन्ट्री फॉर नोटिस फायलिंग (PDE For Notice Filing) म्हणजे काय ?
   

  डिपॉझिट ऑफ टायटल डीड पदधतीने झालेल्या कर्जव्यवहारामध्ये, उभय पक्षामध्ये करारनामा निष्पादित करण्यात आला नसेल, तर कर्जदाराला त्या कर्जव्यवहाराची माहिती नोटिसव्दारे संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयास सादर करावी लागते. यासबंधीच्या सविस्तर माहीतीसा�� ी पहा - याच पुस्तकातील भाग - 2 दस्त नोंदणी या विषयातील प्रकरण - 6 - नो॑टिस ऑफ इन्टिमेशन फायलिंग करणे. सदर नोटिस फायलिंग करण्यासा�� ी नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात न जावे लागता बँका/वित्तीय संस्था यांच्या शाखेतूनच सदर कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येण्यासा�� ी ई-फायलिंग (e-Filing) ही सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्व बँक /वित्तीय संस्था यांना उपलब्ध करुन दिली आहे. तथापि, ज्या बँका/वित्तीय संस्था सदर प्रणाली मध्ये सहभागी झाल्या नाहीत, त्यांचे कर्जदारांना नोटिस फायलिंगची कार्यवाही दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊनच पूर्ण करावी लागते. त्या कर्जदाराने दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष जाण्यापूर्वी त्या नोटिस संदर्भातील माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online services या सदराखाली उपलब्ध असलेल्या PDE for filing या सुविधेचा वापर करुन ऑनलाईन भरणे क्रमप्राप्त असते.
 • पब्लिक डाटा एन्ट्री फॉर नोटिस फायलिंग (PDE for Notice Filing) व्दारे डाटा एन्ट्री कशी करावी ?
   

  पब्लिक डाटा एन्ट्री फॉर नोटिस फायलिंगव्दारे डाटा एन्ट्री पुढील प्रमाणे करावी.
  टप्पा 1:- www. igrmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर Online services या सदराखालील PDE For Filing या �� िकाणी क्लिक करावे.

  टप्पा 2:- उपलब्ध झालेल्या पृष्�� ावरील माहिती काळजीपूर्वक वाचा. विशेषतः Flow शीर्षकाखालील सूचना समजावून घ्या. त्यानंतर तळाच्या डाव्या कोप-यात असलेल्या Start या बटणावर क्लिक करावे.

  टप्पा 3:- उपलब्ध झालेल्या पृष्�� ावर To Start new entry आणि To Modify old Entry असे दोन पर्याय दिसतील. नवीन डाटा एन्ट्री करण्यासा�� ी ‘To Start new entry’ या पर्यायाचा वापर करावा. त्यामध्ये –
  i. Your username मध्ये आपणास योग्य वाटेल तो Username (उदा.SA.PATIL) नमुद करावा.
  ii. Create Your Password मध्ये किमान 8 characters असलेला पासवर्ड नमूद करावा ज्यामध्ये किमान एक Capital Letter आणि किमान एक small letter, किमान एक Special character आणि किमान एक डिजीट(अंक) असणे आवश्यक आहे. (उदा.ABCd@459 किंवा hA%724k)
  iii. Re Type Your Password मध्ये आपला password पुन्हा नमूद करावा
  iv. शेवटच्या ओळीतील मोकळया जागी, शेजारी दिसणारे 5 अंक (Captcha code ) अचूकरीत्या भरावे.
  v. आपला पासवर्ड व युजरनेम आपल्या जवळ नोंदवून �� ेवावे, कदाचित काही दुरुस्त्या करण्यासा�� ी
  vi. त्याची आवश्यकता भासू शकते.
  vii. यानंतर Start Data entry या बटनावर क्लिक करा.

  टप्पा 4:-त्यानंतर उपलब्ध होणा-या पृष्�� ावरील Start Data entry या तक्यामधील,
  i. ‘Date of Mortgae‘ मध्ये आपल्या कर्जव्यवहाराचा दिनांक, शेजारील कॅलेंडरच्या सहाय्याने भरावा.
  ii. त्यानंतर ‘Start Filing new entry‘ या बटनावर क्लिक करावे.

  टप्पा 5 :-‘Mortage Details ’ या पृष्�� ामध्ये बँक/वित्तीय संस्थेची माहिती नमूद करावी.
  i. प्रथम Party Type मध्ये Bank /NBFC यामधून योग्य पर्याय निवडा .
  ii. Select Bank ’पर्याय निवडल्यावर उपलब्ध होणा-या यादीमधून आपली बँक व त्यानंतर Bank Location मधून बँकेची शाखा निवडावी
  iii. उपलब्ध यादीमध्ये आपली बँक/ वित्तीय संस्था किंवा शाखा नसल्यास Add Bank पर्याय
  निवडावा. आणि Add Bank Name मध्ये बँकेचे नाव आणि Add Bank Location मध्ये शाखा नमूद करावी.
  iv. तदनंतर Loan Detail या शीर्षकाखाली Loan या रकान्यामध्ये कर्जाची रक्कम व Intrest Rate या रकान्यामध्ये व्याजाचा दर नमूद करावा
  v. त्यानंतर Save बटनावर क्लिक करावे.
  vi. त्यानंतर ‘Mortagee Added Succesfully’ असा संदेश आल्यानंतर, Close या बटनावर क्लिक करावे.

  टप्पा 6:- Mortgagor Details या पृष्�� ामध्ये कर्जदाराची संपूर्ण माहिती भरावयाची आहे.
  या पृष्�� ावर वरच्या बाजूला Token Number या शीर्षकापुढे 13 अंकी सांकेतांक दिसेल, तो
  आ�� वणीने लिहून �� ेवा.पुढे,डाटा एन्ट्री अर्धवट राहिल्यास, पूर्ण करण्यासा�� ी किंवा दुरुस्त्या करण्यासा�� ी या सांकेताकांची आवश्यकता भासू शकते. त्यानंतर डाटा एन्ट्री सुरु करावी
  i. Party Type या रकान्यामध्ये कर्जदार हा वैयक्तिक पक्षकार आहे किंवा संस्था आहे त्यानुसार Individual किंवा Organisation यापैकी योग्य पर्याय निवडावा.
  ii. त्यानंतर वैयक्तिक कर्जदार/ संस्था यांची संपूर्ण माहिती भरावी.
  iii. त्यानंतर Save बटनावर क्लिक करावे.
  iv. Mortgagor Added Succesfully असा संदेश येईल.
  v. त्यानंतर, जर याच प्रकरणात आणखी एखादा कर्जदार असेल तर Add Another Party या बटनावर क्लिक करा आणि उपलब्ध होणा-या पृष्�� ावर त्या दुस-या कर्जदाराची माहिती भरुन Save करावे. जर अन्य कर्जदार नसेल तर close बटनावर क्लिक करावे.

  टप्पा 7:-Property Details – या पृष्�� ावर,
  i. कर्ज प्रकरणातील मिळकतीचा संपूर्ण तपशील नमूद करावा
  ii. त्यानंतर बॅकेकडे/ वित्तिय संस्थेकडे,त्या मिळकती संदर्भात डिपॉझिट केलेल्या Title Deed ची निवड करावी आणि त्यानंतर त्या Title Deed संदर्भातील इतर माहिती भरावी. यामध्ये एकापेक्षा जास्त Title Deed देखील निवडता येतात.
  iii. त्यानंतर Save बटनावर क्लिक केल्यावर ‘Property Details Added Succesfully’ असा संदेश येईल.
  iv. त्यानंतर जर अन्य मिळकती संदर्भातील Title Deed डिपॉझिट केले असतील, तर Add Another Property या बटनावर क्लिक करा, आणि उपलब्ध होणा-या पृष्�� ावर वरील पद्धतीने, त्या मिळकतीची आणि त्याच्या Title Deed ची माहिती भरा आणि Save करा
  v. जर अन्य मिळकतींचा संबंध नसेल तर ‘Close ’ बटनावर क्लिक करा.

  टप्पा 8:- Payment Details मध्ये,
  i. नोटीशीवर लावलेल्या मुद्रांक शुल्क व फायलिंग फीचा तपशील नमुद करा.
  ii. त्यानंतर Save बटनावर क्लिक करा.
  iii. त्यानंतर त्याच पृष्�� ावरील View Notice या बटनावर क्लिक करा.

  टप्पा 9:-त्यानंतर आपणास Notice of intimation दिसेल.i. त्यातील मजकूर तपासा.
  ii. काही दुरुत्या करणे आवश्यक असेल तर Back बटनावर क्लीक करा
  iii. आवश्यक दुरुस्त्या करण्याकरिता संबंधित नोंद Select करा, दुरुस्ती करुन पुन्हा Save करा. योग्य खातरजमा केल्यानंतर Submit Data या बटनावर क्लिक करा.
  iv. सदर डाटा संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाकडे ऑनलाईन पा�� विला जाईल.
  v. Draft Notice ची PDF फाईल आपल्या संगणकावर उपलब्ध होईल, ती Save करुन �� ेवा.
  vi. नंतर Close बटनावर क्लिक करा.
  vii. त्यानंतर उपलब्ध होणा-या पृष्�� ावर आपणास सदर नोटीस फाईलींग सा�� ी आपण कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयात जावू शकता, त्याची यादी उपलब्ध होईल त्याची नोंद घ्या
  viii. उजव्या कोप-यातील Log Out बटनावर क्लिक करुन बाहेर पडा.
  शेवटचा टप्पा:-संगणकावर डाउनलोड मध्ये Save झालेल्या PDF File ची प्रिंट घ्या.�

 • PDE Filing चा वापर करुन डाटा एन्ट्री केल्यानंतर पुढे कोणती कार्यवाही करावी लागेल ?
   

  PDE Filing चा वापर करुन डाटा एन्ट्री केली म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयात नोटीस फाईल झाली असे नव्हे. आपणास नोटीस सोबत घेवून संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात मुदतीत (कर्ज व्यवहाराचे दिनांकापासून 30 दिवसांच्या आत) जाणे आवश्यक आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील कार्यवाहीच्या सविस्तर माहितीसा�� ी पहा. याच पुस्तकातील भाग-2 दस्त नोंदणी या विषयातील प्रकरण -6 'नोटीस ऑफ इंटिमेशन फायलिंग करणे'.
 • नोटिस फायलिंगसा�� ी पब्लिक डाटा एन्ट्री करुन व प्रणालीमधून बाहेर पडल्यानंतर (Log Out झाल्यानंतर), तयार झालेल्या नोटिसमध्ये काही चुका/त्रुटी दिसून आल्या, तर त्याची दुरुस्ती कशी करावी ?
   

  नोटिस फायलिंगसा�� ी पब्लिक डाटा एन्ट्री करुन प्रणालीमधून बाहेर पडल्यानंतर (Log Out झाल्यानंतर) तयार झालेल्या नोटिसमध्ये काही चुका/त्रुटी दिसून आल्या, तर त्याची दुरुस्ती करण्याकरीता-
  i. www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Online Services या सदराखालील PDE for filing या सुविधेचा वापर करा.
  ii. पहिल्या पानावरील Start Filing New Entry बटनावर क्लिक करा.
  iii. उपलब्ध होणा-या पानावर Start Filing New Entry व To modify old Entry असे दोन पर्याय दिसतील, त्यातील To modify old Entry या पर्यायाचा वापर करा.
  iv. त्यामध्ये Token number या रकान्यामध्ये आपल्याला पूर्वी मिळालेला 13 अंकी सांकेतांक भरा व Password या रकान्यामध्ये आपला Password भरा.
  v. त्यानंतर आपल्याला आपण केलेली डाटा एन्ट्री उपलब्ध होईल. त्यातील सबंधित �� िकाणी दुरुस्त्या करुन प्रत्येक पान Save करा व Close करा.
  vi. सरतेशेवटी View notice पर्यायाचा वापर करुन सुधारित नोटिस पहा व त्याची File संगणकावर सा�� वून प्रिंट घ्या आणि Submit Data बटनावर क्लिक करा.
  vii. सुधारित नोटिसचा वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयात नोटिस दाखल करा.

 • पब्लिक डाटा एन्ट्री फायलिंग प्रणालीचा वापर करण्यासा�� ी काही फी (डाटा एन्ट्री चार्जेस) भरावी लागते का ?
   

  नाही. पब्लिक डाटा एन्ट्री फायलिंग प्रणालीचा वापर करुन डाटा एन्ट्री करण्यासा�� ी कोणतीही फी (डाटा एन्ट्री चार्जेस) आकारली जात नाही.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]