ई-एएसआर (e-ASR)

 • वार्षिक मूल्य दर तक्ते म्हणजे काय?
   

  महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजारमूल्य निश्चित करणे) नियम, 1995 अंतर्गत तयार केलेले जमीन व इमारतीचे दर दर्शविणारे तक्ते म्हणजे वार्षिक मूल्यदर तक्ते होय. (अधिक माहितीसा�� ी पहा भाग 4 – मूल्यांकन.)
 • वार्षिक मूल्य दर तक्ते कोणत्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत?
   

  वार्षिक मूल्य दर तक्ते नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर, Online Services या सदराखाली e-ASR या �� िकाणी उपलब्ध आहेत.
 • नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर एखाद्या गावातील मिळकतीचा वार्षिक मूल्य दर पाहणेसा�� ी काय करावे?
   

  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर एखाद्या गावातील मिळकतीचा वार्षिक दर पाहणेसा�� ी- नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली e-ASR या �� िकाणी Click करावे. e-ASR या �� िकाणी Click केल्यावर त्यानंतर येणा-या महाराष्ट्राच्या नकाशातील इच्छित जिल्हयावर Click करुन जिल्हयाची निवड करावी. आपणांस ज्या वर्षाची माहिती आवश्यक आहे ते वर्ष निवडावे. त्यानंतर उपलब्ध पर्यांयातून मिळकत ज्या गावात स्थित असेल त्या गावाचा तालुका निवडावा. त्यानंतर गाव निवडून Click केल्यावर- सदर गाव ग्रामीण क्षेत्रात असल्यास जमिनीच्या प्रकारानुसार दर दिसेल. गांव नागरी अथवा प्रभाव क्षेत्रामध्ये असेल तर सर्व्हे नंबर किंवा लोकेशननिहाय या पर्यायावर Click करुन मिळकतीचा सर्व्हे नंबर भरल्यानंतर अथवा Location या पर्यायामधील आवश्यक तपशिल निवडल्यानंतर मिळकतीचा वार्षिक मूल्यदर दिसेल.
 • नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर सिटी सर्व्हे नंबर./सर्व्हे नंबर./गट नंबरनिहाय मिळकतीचा वार्षिक मूल्य दर पहाता येतो काय?
   

  • नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर नागरी व प्रभाव क्षेत्रातील गावांबाबत सि.स.नं./स.नं./गट नंबरनिहाय वार्षिक मूल्य दर पहाता येतो.
  • उर्वरित ग्रामीण भागात सि.स.नं./स.नं./गट नंबरनिहाय दर देण्यात आलेले नसून, गावासा�� ी एकत्रितरित्या जमीनीच्या शेतसारा, वापराप्रमाणे व स्थानाप्रमाणे देण्यात आले आहेत.
  • नागरी व प्रभाव क्षेत्रातील गावांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Activities या सदराखाली Valuation of Property या �� िकाणी उपलब्ध आहे.

 • e-ASR मध्ये जमिनीचे प्रकारानुसार (उदा. गायरान, बिनशेती इ.) दर पहाता येतो काय?
   

  e-ASR मध्ये प्रभाव व ग्रामीण क्षेत्रातील जमिनीचे प्रकारानुसार (उदा. गायरान, बिनशेती इ.) दर पहाता येतो. नागरी क्षेत्रासा�� ी सर्व्हे नंबर/गट नंबर निहाय वार्षिक मूल्य दर दिले असल्याने सदर बाब लागू नाही.
 • e ASR मध्ये एखाद्या मूल्यविभागात समाविष्ट असणाऱ्या सिटी सर्व्हे नंबर./सर्व्हे नंबर./गट नंबर याची माहिती मिळू शकते काय?
   

  होय. e ASR मध्ये नागरी व प्रभाव क्षेत्रातील एखाद्या मूल्यविभागात समाविष्ट असणा-या सिटी सर्व्हे नंबर/सर्व्हे नंबर/गट नंबर याची माहिती मिळू शकते. सदर बाब ग्रामीण क्षेत्रातील गावांसा�� ी सदर माहिती दिली जात नाही.
 • सर्व्हे नंबरचा पर्याय निवडून त्या सर्व्हे नंबरच्या मूल्य विभागाची माहिती मिळत नसल्यास काय करावे?
   

  सर्व्हे नंबरचा पर्याय निवडून त्या सर्व्हे नंबरच्या मूल्य विभागाची माहिती मिळत नसल्यास, सदर मिळकतीचा सिटी सर्व्हे नंबर अथवा अंतिम भूखंड क्रमांक (नागरी क्षेत्रातील नगर रचना योजनेच्या बाबतीत) टाकून शोध घ्यावा अथवा Location चा पर्याय निवडून त्या आधारे दराचा शोध घ्यावा.
 • इ ASR मध्ये नागरी/प्रभावक्षेत्रातील सर्व्हे नंबर अथवा Location हे दोन्ही पर्याय निवडूनही एखादया मिळकतीचा दर आढळून येत नसल्यास काय करावे ?
   

  e ASR मध्ये नागरी/प्रभावक्षेत्रातील सर्व्हे नंबर अथवा Location हे दोन्ही पर्याय निवडूनही एखादया मिळकतीचा दर आढळून येत नसल्यास,संबंधित उपसंचालक/ सहायक संचालक, नगररचना, (मूल्यांकन)यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.
 • e-ASR मध्ये एखादया मिळकतीच्या विशिष्ट प्रयोजनाच्या वापराचा (उदा.रहिवास, वाणिज्य, औद्योगिक इ.) दर शून्य नमूद असल्यास काय करावे ?
   

  e- ASR मध्ये नागरी प्रभावक्षेत्रातील एखादया मिळकती संदर्भात जमीनीचा दर उपलब्ध आहे मात्र, त्या जमीनीवरील इमारतीच्या विशिष्ट वापरासा�� र (उदा.रहिवास, वाणिज्य, औद्योगिक इ.) दर शून्य नमूद असल्यास मुंबई व उपनगरासा�� ी असलेली मार्गदर्शक सूचना क्र. 7 व उर्वरित महाराष्ट्रासा�� ी असलेली मार्गदर्शक सूचना क्र. 6 विचारात घेवून दर निश्चित करण्यात यावा. त्याआधारेही दर समजून येत नसल्यास संबंधित उपसंचालक/ सहायक संचालक, नगर रचना, मूल्यांकन यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]