ई-रजिस्ट्रेशन (e-Registration)

 • ई-रजिस्ट्रेशन म्हणजे काय ?
   

  आपल्या दस्ताची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात न जाता, आपल्या सोयीच्या �� िकाणावरुन व आपल्या सोयीच्या वेळी करण्याची सुविधा म्हणजे ई-रजिस्ट्रेशन होय. इंटरनेटचा वापर करुन आपण सध्या या सुविधेव्दारे विभागाने निश्चित केलेल्या नमुन्यामध्ये आपल्या Leave & License च्या दस्ताची नोंदणी करु शकता. ही सुविधा www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेत स्थळावर Online Services या सदराखाली e-Registration या �� िकाणी उपलब्ध आहे.
 • ई-रजिस्ट्रेशनचे नागरिकांना कोणते फायदे आहेत ?
   

  ई-रजिस्ट्रेशनचे फायदे खालीलप्रमाणे आहेत

  • � इंटरनेटची सुविधा असलेल्या आपल्या सोयीच्या �� िकाणावरुन दस्त तयार करु शकता.
  • � कोणत्याही वेळी (24 X 7) दस्त नोंदणीसा�� ी सादर करता येतो.
  • � नोंदणीसा�� ी दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागत नाही.
  • � दस्तातील सर्व पक्षकार एका वेळी एकाच �� िकाणी हजर असण्याची गरज नाही.

 • ई-रजिस्ट्रेशन ही सुविधा कोणत्या दस्तासा�� ी उपलब्ध आहे ?
   

  सध्या नागरिकांना ही सुविधा संमती-नि-परवानगी करार (Leave & License) प्रकाराच्या दस्तांसा�� ी उपलब्ध आहे. शिवाय विकसक / बांधकाम व्यावसायिकांद्वारे प्रथमतः विकत असलेल्या नव्या सदनिकांच्या विक्री करारांची (Agreement to Sale) नोंदणी बांधकाम व्यावसायिक / विकसकाच्या कार्यालयातून करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
 • ई-रजिस्ट्रेशन सुविधेचा वापर करण्यासा�� ी काय साधनसामुग्री व इतर पूर्वतयारी आवश्यक असते ?
   

  ई-रजिस्ट्रेशन या सुविधेचा वापर करण्यासा�� ी खालीलप्रमाणे साधनसामुग्री व इतर पूर्वतयारी आवश्यक असते-

  i. संगणकाला इंटरनेट जोडणी
  ii. थंब स्कॅनर / बायोमेट्रीक डिव्हाईस
  iii. वेब कॅमेरा
  iv. प्रिंटर
  v. सर्व पक्षकारांचे आणि ओळखदारांचे (Identifiers) आधार क्रमांक (UID number) आवश्यक आहेत
  vi. या सुविधेद्वारे नोंदवावयाच्या दस्तांची नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्क हे ई- पेमेंट व्दारे (ई चलन / साधी पावती) भरणे आवश्यक आहे.
  vii. ई-रजिस्ट्रेशनद्वारे नोंदवावयाच्या दस्तांसा�� ी e-SBTR च्या माध्यमातून मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरु नये.
  viii. विभागाने दिलेल्या दस्ताच्या नमुन्यातच दस्त नोंदणी करावी लागते.

 • लिव्ह अँड लायसन्स कराराच्या ई-रजिस्ट्रेशनची सर्वसाधारण कार्यपद्धती सांगा
   

  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Online Services या सदराखालील e-Registration या सुविधेद्वारा ई-रजिस्ट्रेशन करता येते. त्यासा�� ी

  i. संकेतस्थळावरील Online Services या सदराखालील e-Registration of L & L या पर्यायावर क्लिक करा.
  ii. Compatability view निवडा
  iii. पहिल्या पानावरील New entry रकान्यामध्ये मालमत्ता ज्या जिल्हयातील आहे, तो जिल्हा निवडा.
  iv. आपला पासवर्ड तयार करा. हा पासवर्ड किमान आ�� Characters चा असावा, ज्यामध्ये किमान एक कॅपिटल लेटर, एक स्पेशल कॅरेक्टर व एक अंक असावा उदा.Nic@1234 किंवा 12#Qwrty
  v. तयार केलेला पासवर्ड पुन्हा नोंदवा (Re-enter)

  • मालमत्तेचा तपशील


  i. आता मालमत्तेचा तपशील नोंदवावयाचा असून आवश्यक मजकूर भरुन झाल्यानंतर Save बटणावर क्लिक करा
  ii. आता संगणकाच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला 11 अंकी टोकन क्रमांक दिसेल, तो लिहून �� ेवावा
  iii. Property added successfully असा संदेश दिसल्यानंतर Next Party Details पर्याय निवडावा.

  • भाडेकरु तपशील

  i. आता प्रथमतः Licensee हा प्रकार निवडा व मालमत्ता भाडेकराराने घेणा-याचा (Licensee) तपशील भरावा.
  ii. आधार क्रमांक (UID number) अनिवार्य असून तो अचूक भरा
  iii. Save बटणावर क्लिक करा.
  iv. Party added successfully असा संदेश मिळाल्यानंतर जर Licensee एका पेक्षा अधिक असतील तर Party Type या पर्यायातल Licensee हा पर्याय निवडा व त्याची माहिती भरा. प्रत्येक Licensee ची माहिती भरुन झाल्यानंतर Save बटणावर क्लिक करा.

  • मालक तपशील


  i. सर्व Licensee ची माहिती भरुन झाल्यानंतर Party Type मध्ये Licensor प्रकार निवडा. मालमत्ता भाडेकराराने देणा-याचा सर्व तपशील भरा.
  ii. आधार क्रमांक (UID number) अनिवार्य असून तो अचूक भरा
  iii. सर्व Licensor ची माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला ओळखदारांची (Identifiers) माहिती भरावयाची आहे. दस्तातील सर्व पक्षकारांना ओळख देणारे दोन ओळखदार आवश्यक असतात. तसे ओळखदार उपलब्ध नसतील, तर दस्तातील प्रत्येक पक्षकाराला ओळखणारे प्रत्येक दोन ओळखदार आवश्यक आहेत.
  iv. ओळखदाराची माहिती भरण्यासा�� ी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी
  v. Party Type मधे Add Identifiers details वर क्लिक करावे
  vi. ज्या पक्षकारासा�� ी ओळखदार ओळख देणार आहे, तो पक्षकार निवडावा.
  vii. ओळखदाराचा सर्व तपशील बिनचूक भरावा. ओळखदाराचा आधार क्रमांक (UID number) नमूद करणे अनिवार्य आहे.
  viii. ओळखदाराचा सर्व तपशील भरून झाल्यावर Save बटणावर क्लिक करावे.
  ix. Identifiers added successfully असा संदेश मिळाल्यानंतर Add Another Identifiers वर क्लिक करावे व त्याचा तपशील भरावा, अशा प्रकारे सर्व ओळखदारांचा तपशील भरावा.

  • भाडे व इतर अटी

  i. दस्तातील मिळकत, पक्षकार व ओळखदार यांचा तपशील भरून झाल्यानंतर Add rent and other terms बटणावर क्लिक करावे.
  ii. Period मध्ये भाडे कराराचा कालावधी पुर्ण महिन्यांमध्ये नमूद करावा. हा कालावधी 60 महिन्यांपेक्षा अधिक नसावा.
  iii. From च्या रकान्यामध्ये कॅलेंडरच्या सहाय्याने भाडे करार सुरु होणार असलेली / सुरु झालेली तारीख भरावी. ही तारीख भाडेकरारावर स्वाक्षरी करण्याच्या तारखेला 4 महिन्यांपेक्षा जुनी नसावी.
  iv. Stamp duty आणि Registration Fee रकान्यामध्ये आपण अगोदरच यांचे ई पेमेंटद्वारे प्रदान केले असल्यास, प्राप्त झालेला GRN (Government Refernce Number) आणि प्रदानाची तारीख नमूद करावी अन्यथा 'Pay Now' चा पर्याय वापरून मुद्रांक शुल्क व नोंदणी फी ऑनलाईन भरावी.
  v. Verify बटण दाबून आपण केलेल्या प्रदानाची खात्री करावी.
  vi. Document executed at location या रकान्यामध्ये ज्या �� िकाणावरुन दस्त निष्पादित होणार आहे ते स्थळ / गाव नमूद करावे.
  vii. Deposit (Refundable/Non refundable) रकान्यामध्ये रक्कम टाकल्यास Payment details of deposit असा रकाना दिसेल, त्यामध्ये डिपॉझिटची माहिती भरावी. व्यवहारामधे डिपॉझिट अंतर्भूत नसल्यास Deposit रकान्यामध्ये काहीही भरु नये.
  viii. त्यानंतर Select terms and condition box मधील + या चिन्हांवर क्लिक केल्यास Maintenance charges बाबतच्या दायित्वाच्या अटी दिसतील, त्या काळजीपूर्वक वाचून आपल्या करारासा�� ीची अट निवडा. या पैकी कोणतीही एकच अट निवडणे अनिवार्य आहे.
  ix. Maintenance charges च्या अटीची निवड केल्यानंतर View the selected terms & condition बटण क्लिक करुन निवडलेली अट पाहून घ्या.
  x. आपण मालमत्ता, पक्षकार, ओळखदार यांचे बाबत भरलेली माहिती व Maintenance charges बाबत निवडलेल्या अटीचा वापर आपला दस्त तयार होण्यासा�� ी होतो.
  xi. अटी निवडल्यानंतर Save बटणावर क्लिक करा.

  • प्रारुप दस्त

  i. Submit successfully असा संदेश प्राप्त झाल्यानंतर View draft document बटणावर क्लिक करा.
  ii. आपण भरलेल्या माहीतीच्या आधारावर तयार झालेला भाडेकराराचा प्रारुप दस्त आपणास दिसेल, हा दस्त काळजीपूर्वक वाचा.
  iii. त्यात दुरुस्ती करावयाची असल्यास Back बटणाचा वापर करुन आवश्यक दुरुस्ती करावी.

  • निष्पादन

  i. दस्त अपेक्षेप्रमाणे आहे, अशी खात्री पटल्यानंतर Execute बटण क्लिक करा, त्यानंतर येणारा संदेश वाचा. सर्व पक्षकारांनी सहमती दाखवली आणि सदर दस्त निष्पादित करुन कबूल करण्याची सर्वांची तयारी असेल, तर Ok बटण क्लिक करा.
  ii. त्यानंतर दस्तातील पक्षकारांच्या नावाची यादी आणि साक्षीदारांची नावे दिसतील. त्यातील एक-एक पक्षकार निवडून त्यांचा फोटो घ्यावा व आणि थंब स्कॅनरच्या मदतीने अंग�� याचे �� से घ्या. फोटो व अंग�� याचे �� से घेताना संबंधित पक्षकाराचा पूर्ण चेहरा व पूर्ण अंग�� ा घेतला जाईल याची दक्षता घ्यावी. ही सर्व प्रकिया साक्षीदार तथा ओळखदार यांचे उपस्थिती मधे पूर्ण करावी, व त्यानंतर याच प्रमाणे संबंधित साक्षींदार तथा ओळखदार यांचे ही फोटो व अंग�� याचे �� से घ्यावेत.
  iii. पक्षकारांना वाटल्यास ते त्यांची Digital signature दस्तावर सही करण्यासा�� ी वापरु शकतात.
  iv. प्रत्येक पक्षकार व ओळखदार यांचा आधार क्रमांक व अंग�� याचा �� सा घेतल्यानंतर Validate च्या बटणावर क्लिक करा, त्यानंतर ई- रजिस्ट्रेशनचे सॉफटवेअर आधार सर्व्हर वरुन ही माहिती तपासून घेईल.

  • दस्त नोंदणीस सादर करणे

  i. या नंतर Submit बटणावर क्लिक करा. आपला दस्त नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधकांकडे (Sub registrar at back end) नोंदणीकरिता सादर होईल.
  ii. Submit करण्यापूर्वी आपण Log Out केल्यास/झाल्यास 11 अंकी टोकन क्रमांक आणि पासवर्ड Modify entry या रकान्यात टाकून पुन्हा Submit करु शकता.
  iii. Execution पूर्वी Edit सुविधेचा वापर करुन दस्तात दुरुस्ती करु शकता.
  iv. दस्त Submit केल्यानंतर View status पर्यायाचा वापर करुन आपण नोंदणीस सादर केलेल्या दस्ताची सद्यस्थिती पाहू शकता.

  • दस्त नोंदणी

  • आपण दस्त Submit केल्यानंतर दुय्यम निबंधक दस्ताची तपासणी करतील. दस्तात त्रुटी असल्यास त्या नमूद करतील, View status च्या माध्यमातून आपण त्या पाहू शकाल. त्रुटींची पूर्तता केल्यानंतर दुय्यम निबंधक दस्तावर निर्णय देतील.
  • दस्त नोंदणीस पात्र आढळल्यास, दुय्यम निबंधक दस्ताची नोंदणी करतील, आपण नोंदणीकृत दस्त, पावती व सुची दोन डाऊनलोड करु शकाल.
  • आपण दस्त नोंदणीकरिता सादर केल्यानंतरच्या पढील कामाच्या दिवसापर्यंत (Next working day) दुय्यम निबंधकाने आपला दस्त निर्णित करणे अपेक्षित आहे.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]