मुद्रांक शुल्क परताव्यासा� ी डाटा एन्ट्री (Data Entry for Stamp Duty Refund)

 • कोणत्या प्रकरणात मुद्रांक शुल्क परतावा मिळू शकतो?
   

  खालील प्रकरणात मुद्रांक शुल्क परतावा मिळू शकतो.
  अ) कोणत्याही व्यक्तीने सही करण्यापूर्वी मुद्रांक अनावधानाने, अहेतुकपणे किंवा लिखाणातील चुकांमुळे नियोजित प्रयोजनासा�� ी सदर मुद्रांक अयोग्य झाला असल्यास;
  ब) पूर्णतः किंवा अंशतः लिहिलेला परंतु स्वाक्षरी न केलेला मुद्रांक;
  क) कोणत्याही पक्षकाराने स्वाक्षरी करुन दिलेला मुद्रांक लावलेला दस्तऐवज.
  सविस्तर माहितीसा�� ी पहा भाग-3: मुद्रांक शुल्क

 • पक्षकाराला मुद्रांक शुल्क परताव्यासा�� ी ऑनलाईन पध्दतीने माहिती भरणे आवश्यक आहे काय ?
   

  होय, पक्षकाराला मुद्रांक शुल्क परताव्यासा�� ी ऑनलाईन पध्दतीने माहिती भरणे आवश्यक आहे. प्रथमतः मुद्रांक शुल्क परताव्यासा�� ी ऑनलाईन पध्दतीने माहिती भरावी लागते व त्याचे टोकनसह प्रत्यक्ष अर्ज संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात विहित मुदतीमध्ये सादर करावा लागतो.
 • पक्षकाराला मुद्रांक शुल्क परताव्यासा�� ी माहिती कोणत्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन भरता येईल ?
   

  पक्षकाराला मुद्रांक शुल्क परताव्यासा�� ी महिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharahtra.gov.in या संकेतस्थळावरील Online Services या सदराखालील Refund Application या सुविधेचा वापर करुन Online भरता येईल.
 • मुद्रांक शुल्क परताव्यासंबंधी कोणकोणती माहिती ऑनलाईन भरणे आवश्यक आहे ?
   

  परताव्यासंबंधी खालील माहिती भरणे आवश्यक आहे.

  1. 1) अर्जदाराने स्वतःची माहिती जसे, नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, बँकेचे नाव, खाते क्रमांक व परतावा मागणीचे कारण भरावे.
  2. 2) दस्तऐवजाचा तपशील – यामध्ये दस्तऐवजाची माहिती भरावी. दस्तऐवज निष्पादीत आहे/नाही, दस्ताचा प्रकार, दस्तऐवज नोंदणीकृत असल्यास-
   अ) दस्त क्रमांक,
   ब) दिनांक,
   क) दुय्यम निबंधक कार्यालयाचे नांव,
   ड) तसेच रद्दपत्र नोंदणीकृत असल्यास त्याचा नोंदणी क्रमांक, दिनांक व
   दुय्यम निबंधक कार्यालयाचे नांव नमूद करावे.
  3. मुद्रांकाचा तपशील – यामध्ये मुद्रांकाचा प्रकार (उदा.फ्रँकिंग, e-SBTR, इत्यादी) मुद्रांक विक्रेत्याचे नांव व पत्ता, मुद्रांक खरेदीदाराचे नाव, मुद्रांक खरेदीचा दिनांक, मुद्रांकाचा क्रमांक, मुद्रांकाची रक्कम ही माहिती भरावी आणि मुद्रांक ज्या जिल्हयातून खरेदी केले आहेत तो जिल्हा निवडावा.
  4. एकापेक्षा जास्त मुद्रांक खरेदी केले असतील, तर – मुद्रांकाचे नग एकापेक्षा जास्त असतील त्याबाबत Submit & Add more stamp details या पर्यायावर क्लीक करावे, त्यानंतर पुन्हा Stamp details हा पर्याय येईल. त्यामध्ये मुद्रांकाच्या प्रत्येक नगाची माहिती भरावी. मुद्रांकाची पूर्ण माहिती भरल्यानंतर लाल रंगामध्ये Image Code असेल, तो Image Code त्याच्या खाली असलेल्या रिकाम्या चौकटीत नमूद करुन Register बटणावर क्लिक करावे, यानंतर आपली परताव्यासा�� ीची महिती Online सादर होते.
  5. परताव्यासा�� ीची महिती यशस्वीरित्या ऑनलाईन सादर झाल्यानंतर Acknowledgement (पावती) हा पर्याय दिसेल, त्यात Refund token/Code number लाल रंगात दिसेल. सदर Refund token/Code number ची स्वतःकडे नोंद करुन घ्यावी आणि प्रिंट काढून घ्यावी. सदर Refund token/Code number मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष परतावा प्रकरण दाखल करावयाच्या अर्जावर नमूद करुन अर्ज विहित मुदतीत संबधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात समक्ष सादर करावा.

 • मुद्रांक शुल्क परतावा अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे सादर करावीत?
   

  मुद्रांक शुल्क परतावा अर्जासोबत मुद्रांक शुल्काचे प्रकारानुसार सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी उत्तरामध्ये उपलब्ध आहे. ती खालीलप्रमाणे-

  अ) परतावा अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावीत.-

  • ऑनलाईन अर्ज भरल्याचे टोकन
  • मूळ मुद्रांकासह दस्तऐवज
  • हस्ते मुद्रांक खरेदी केला असल्यास अशा व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र
  • मुद्रांक शुल्क भरल्याचे चलन/पावती
  • प्राधिकृत व्यक्ती परतावा अर्ज करत असल्यास अधिकारपत्र अथवा मुखत्यारपत्राची प्रमाणित प्रत
  • नोंदणीकृत करारावरील मुद्रांक शुल्काचा परतावा असल्यास मूळ नोंदणीकृत करार व नोंदणीकृत रद्दपत्र

  ब) या व्यतिरिक्त मुद्रांक भरणा केल्याच्या पध्दतीनुसार खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत-

  फ्रँकींगद्वारे मुद्रांक खरेदी केले असतील तर-

  • मुद्रांक विक्री प्रमाणपत्र
  • मुद्रांक विक्री नोंदवहीचा उतारा;
  • संबंधित फ्रँकींग विक्रेत्याकडून हायपरलिंक टर्मिनल रिपोर्ट;
  • फ्रँकिंग विक्रेत्याकडून रिबीन कार्ट्रेजमधील संबंधित �� शाची साक्षांकित छायाप्रत, किंवा

  वरीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राची पूर्तता होत नसल्यास पिटनी बाऊज कंपनीचे (फ्रँकिंग मशीन उत्पादक कंपनी) मूळ मुद्रांक �� शाच्या शेजारी �� शाच्या खरेपणाबाबतचे प्रमाणपत्र.
  ई-एसबीटीआर/साधी पावती/ई-चलनाद्वारे ई-पेंमेंट केले असल्यास
  मुद्रांक शुल्क भरणा केल्याचे ई-चलन
  ई-स्टँपद्वारे मुद्रांक खरेदी केले असतील तर-

  1. स्टॉक होल्डींग कार्पेरेशन ऑफ इंडिया लि. (SHCIL) कडील एकत्रित मुद्रांक शुल्क शासनाला जमा केल्याल्या चलनाची प्रत.
  2. मुद्रांक विक्री प्रमाणपत्र व विक्री नोंदवहीचा उतारा.

  कोषागारातून किंवा मुद्रांक विक्रेत्याकडून मुद्रांक कागद खरेदी केले असतील तर-

  1. � मुद्रांक कोषागार उप कोषागारातून खरेदी केला असल्यास संबधित कोषागार /उप कोषागाराचे प्रमाणपत्र
  2. � मुद्रांक विक्रेत्याचे प्रमाणपत्र व मुद्रांक विक्री नोंदवहीची प्रत/उतारा
 • मुद्रांक शुल्क परतावा अर्ज मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचा कालावधी किती आहे?
   

  मुद्रांक शुल्क परतावा अर्ज, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 48 मध्ये नमूद कालावधीत संबधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]